Ad will apear here
Next
अण्णासाहेब किर्लोस्करांचे पद : राधाधरमधुमिलिंद जय जय : सादरकर्ते - डॉ. रवींद्र घांगुर्डे (व्हिडिओ)
‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ची स्थापना करून महाराष्ट्रात संगीत नाटकांचे नवे युग निर्माण करणारे बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा ३१ मार्च हा जन्मदिन. १८८२ साली त्यांनी ‘संगीत सौभद्र’ हे स्वतंत्र संगीत नाटक लिहून रंगभूमीवर आणलं आणि त्या नाटकाने इतिहासच घडवला. सुविहित कथानक, नैसर्गिक संवाद, आकर्षक व्यक्तिरेखा, सुंदर मधुर पदं आणि उपरोधात्मक विनोदाची पेरणी अशा वैशिष्ट्यांमुळे या नाटकाची मोहिनी आजही कायम आहे. अण्णासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त, या नाटकातील ‘राधाधरमधुमिलिंद जय जय’ या पदाच्या, ज्येष्ठ कलावंत डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी केलेल्या सादरीकरणाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातील व्हिडिओ शेअर करत आहोत. याचे संगीतही अण्णासाहेबांनीच दिलेले आहे.



(अण्णासाहेब किर्लोस्करांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. रवींद्र आणि डॉ. वंदना घांगुर्डे या संगीत रंगभूमीवरील सेवाव्रती दाम्पत्याची खास मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZKZCK
Similar Posts
पुण्यात उलगडतोय संगीत नाटकांचा सुवर्णकाळ; पहिल्या संगीत नाट्य-तंत्रज्ञ संमेलनाचे आयोजन पुणे : पुण्यातील भरत नाट्य संशोधन मंदिराला नुकतीच १२५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने, चार नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत संस्थेत पहिले संगीत नाट्य-तंत्रज्ञ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखतींसोबतच संगीत नाटक महोत्सवही होणार आहे. तसेच १०० वर्षांतील संगीत नाटक कलावंतांच्या
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
‘फर्स्ट टेक’ स्पर्धेत पुण्याचे चारुदत्त पांडे विजेते अहमदाबाद : ‘फर्स्ट टेक’ या राष्ट्रीय पातळीवरील पेंटिंग, प्रिंट्स, सिरॅमिक व शिल्पकला क्षेत्रातील स्पर्धेत पुण्याच्या चारुदत्त पांडे यांनी पहिल्या दहा विजेत्यांमध्ये स्थान पटकावले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अंदाजे दोन हजार ३५० कलाकृतींपैकी १३० कलाकृतींची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली आणि त्यातून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language